Last Updated: Friday, August 16, 2013, 08:23
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईबॉलिवुड अभिनेत्री कायनात अरोरा हिचा पहिला सिनेमा ‘ग्रॅड मस्ती’ हा आहे. या सिनेमामुळे ती खूप आनंदीत आहे. मात्र, आपण शुटींगच्यादरम्यान सेटवर चोरी करत होते, अशी तिनेच कबुली दिली आहे.
कायनातने मोठ्या किमतीच्या वस्तूची चोरी केलेली नाही. तिने जेवण चोरल्याची कबुली दिली आहे. फिल्म शुटींगच्यावेळी कायनाचे सहकलाकार विवेक ओबेरॉयची पत्नी प्रियांका आणि रितेश देशमुखची पत्नी जेनेलिया दररोज सेटवर घरचे जेवण आणत असत. यावेळी तिची मैत्री सहकलाकार विवेक आणि रितेश यांच्या पत्नीशी झाली.
कायनातला घरचे जेवण अधिक पसंत आहे. ती घरच्या जेवणावर ताव मारते. हीच संधी तिने सेटवर घरचे जेवण घेऊन येणाऱ्या प्रियांका आणि जेनेलिया यांच्याशी साधली. विवेकचा घरून येणारा डबा कायनातने तिन दिवस चोरून नेला आणि भोजनावर ताव मारला.
विवेकला तिन दिवस समजले नाही. घरून येणारा डब्बा कोण घेऊन जात आहे ते. शेवटी विवेकला समजले. आपला जेवणाचा डबा दुसरे तिसरे कोणीही नेत नाही तर आपली सहकारी कायनात आहे. ही बाब कायनातनेच सांगितली. त्यानंतरच तिच्या चोरीची कथा समोर आली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Friday, August 16, 2013, 08:06