विश्वरुपमचा नवा रेकॉर्ड; २०० करोडोंची कमाई, Kamal Haasan’s ‘Vishwaroopam’ sets new record, earns Rs 200 crores!

विश्वरुपमचा नवा रेकॉर्ड; २०० करोडोंची कमाई

विश्वरुपमचा नवा रेकॉर्ड; २०० करोडोंची कमाई
www.24taas.com, मुंबई

सिनेमाच्या प्रदर्शनासाठी देशभर विरोधाचा सामना केल्यानंतर अभिनेता कमल हसन याचा विश्वरुपम रिलीज झाला आणि अवघ्या काही दिवसांत या सिनेमानं जगभरात दोनशे करोड रुपयांची कमाई करून दाखवलीय. शंभर करोडचा क्लब मोडीत काढल्यानं हा सिनेजगतातला आणखी एक रेकॉर्ड ठरलाय.

अनेक वादानंतर तामिळनाडूमध्ये गेल्या सात फेब्रुवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमानं प्रेक्षकांची भरपूर वाहवा मिळवली. या सिनेमाच्या या नव्या रेकॉर्डबद्दल सिनेमाची अभिनेत्री पूजा कुमार हिनं न्यूजर्सीमध्ये माहिती दिलीय.

रहस्य आणि रोमांच उभं करणाऱ्या या सिनेमात राहुल बोस तसंच ऑस्कर विजेता अभिनेता शेखर कपूर यांनी अभिनय केलाय. उत्तर भारतात हा सिनेमा एक फेब्रुवारी रोजी हिंदी भाषेतून प्रदर्शित करण्यात आला होता.

First Published: Friday, March 1, 2013, 15:45


comments powered by Disqus