विश्वरुपमचा नवा रेकॉर्ड; २०० करोडोंची कमाई

Last Updated: Friday, March 1, 2013, 15:45

सिनेमाच्या प्रदर्शनासाठी देशभर विरोधाचा सामना केल्यानंतर अभिनेता कमल हसन याचा विश्वरुपम रिलीज झाला आणि अवघ्या काही दिवसांत या सिनेमानं जगभरात दोनशे करोड रुपयांची कमाई करून दाखवलीय.

'तामिळ विश्वरुपम'चा पहिला दिवस ५.८१ कोटींचा

Last Updated: Saturday, February 9, 2013, 18:26

सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात आडकलेला विश्वरुपम अखेर चेन्नईत प्रदर्शित झाला आणि या चित्रपटानं पहिल्याच दिवशी तब्बल ५.८१ कोटी रूपयाचा गल्ला गोळा केलाय.

वाद मिटला,`विश्वरुपम`चे सिन्स कापणार

Last Updated: Saturday, February 2, 2013, 22:02

`विश्वरुपम` सिनेमातील सात सिन्स कापण्यास कमल हसन तयार झाल्याने तामिळनाडूत या चित्रपटाचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झालाय. कमल हसन आणि मुस्लीम संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा झाल्यानंतर काही सिन्स कापण्यात येणार आहेत.

‘विश्वरुपम’ला महाराष्ट्रात आबा देणार सुरक्षा!

Last Updated: Friday, February 1, 2013, 09:51

कमल हसनच्या बहुचर्चित विश्वरूपम् या सिनेमाच्या प्रदर्शनाला राज्यात संपूर्ण सुरक्षा देणार असल्याचं आश्वासन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिलंय.

कमल हसनशी माझं वैयक्तिक वैर नाही - जयललिता

Last Updated: Thursday, January 31, 2013, 14:32

‘विश्वरुपम’वरून निर्माण झालेल्या वादामुळे तामिळनाडूतील राजकीय वातावरणही चांगलच तापलंय. सुरक्षितेच्या कारणास्तव कमल हसनच्या `विश्वरूपम` या चित्रपटावर बंदी घातली गेली असून त्यामागे माझा कोणताही वैयक्तिक हेतू नव्हता, असं स्पष्टीकरण तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी दिलंय.

विश्वरुपमच्या वादानंतर... ‘सिनेमेटोग्राफी’ कायद्यात बदल?

Last Updated: Thursday, January 31, 2013, 12:57

‘विश्वरुपम’या चित्रपटावरून निर्माण झालेल्या वादानंतर केंद्र सरकार कायद्यांत बदल करण्याचा विचार करतंय. याविषयीचे संकेत केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री मनिष तिवारी यांनी कायद्यात बदल करण्याचे संकेत दिलेत.

हताश कमल हसननं दिली देश सोडण्याची धमकी...

Last Updated: Wednesday, January 30, 2013, 13:31

अभिनेता कमल हसननं ‘मला न्याय मिळाला नाही तर मी देश सोडून निघून जाईन’ असा धमकीवजा इशाराच कमल हसननं दिलाय.

आज होणार `विश्वरुपम`चा फैसला...

Last Updated: Tuesday, January 29, 2013, 09:36

कमल हसनचा बहुचर्चित चित्रपट `विश्वरुपम` तमिळनाडूमध्ये प्रदर्शित होणार की नाही? याबाबत मद्रास उच्च न्यायालयाची सुनावणी आज होणार आहे.