Last Updated: Wednesday, April 17, 2013, 08:12
www.24taas.com, चंबळअभिनेत्री कंगना राणावत सध्या चंबळच्या खो-यात "रिव्हॉल्वर राणी` या सिनेमाचं शूटिंग करतेय. पोलिसांनी त्यांना सायंकाळी पाचपर्यंत शूटिंग संपवून रोज ग्वाल्हेरला परतण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र दोन दिवसांपूर्वी त्यांच्या युनिटची गाडी काही दरोडेखोरांनी अडविली. 10-15 जणांनी कंगनाच्या गाडीला घेराव घातला. तिच्या सोबत फोटो काढण्याची दरोडेखोरांची इच्छा होती. युनिटसोबत दिग्दर्शक साई कबीर हे देखील होता.
कबीर यांनी सांगितले की, `मी या परिसरात पंधरा वर्षे राहिलो आहे. त्यामुळे अशी परिस्थिती ओढवल्यास त्याला कशाप्रकारे सामोरे जायचे हे मला ठाऊक होते.` साई कबीर यांनी सांगितले की, ``मी दरोडेखोरांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी आमच्यात वादही झाला.
दरोडेखोरांची भेट कंगनाबरोबर होऊ दिली नाही. कंगनासोबत पोलीस व्हॅन होती आणि कॉन्सेटबलकडे मशीन गनसुद्धा होती. त्यामुळे दरोडेखोर काही करु शकले नाहीत.
First Published: Wednesday, April 17, 2013, 08:11