Last Updated: Tuesday, April 15, 2014, 10:43
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईबॉलिवुड अभिनेत्री कंगना राणावत ही सध्या आपला नवा चित्रपट ‘रिव्हॉल्वर रानी’ मुळे चर्चेत आहे. चित्रपटात कंगना आणि त्याचा को-स्टार वीर दासच्या एका जबरदस्त ‘किस’बद्दल मायनगरी चर्चेला उधाण आले आहे. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी कंगना हिने वीर दासला अशा प्रकारे किस्स केले, की त्याच्या ओठातून रक्त वाहू लागले.
चित्रपटातील एका सीनमध्ये कंगनाला अटक करून जेलमध्ये घेऊन जाताना दाखविले आहे. या दरम्यान एका महत्वाचे काम सांगून वीर दासला एका रूममध्ये ओढून घेऊन जाते. त्यावेळी असा काही किस घेते की त्याच्या ओठातून रक्त वाहू लागते.
आतापर्यंत कोणत्याही अभिनेत्रीने अशा प्रकारे खतरनाक भूमिका कोणत्याही चित्रपटात वढवली नसल्याचेही सांगितले जात आहे. कंगनाचा हा चित्रपट २५ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटात कंगना दबंग आणि सनकी स्वभावाची आहे. यापूर्वीच्या कंगनाच्या क्वीन चित्रपटात अत्यंत उलट भूमिका वढवली आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, April 14, 2014, 19:40