Last Updated: Wednesday, May 29, 2013, 16:26
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई बॉलिवूडचा प्रख्यात निर्माता – दिग्दर्शक करण जोहर लवकरच ‘बाप’ बनणार आहे. ही बातमी खुद्द करणनंच दिलीय. आपण बिना लग्नाचाच बाप बनणार असल्याचं त्यानं एका वर्तमानपत्राशी बोलताना सांगितलंय.
करण जोहर एका लहान मुलाला दत्तक घेऊन आपल्या जीवनात आणखीन आनंद भरणार आहे. तो म्हणतो, ‘परिवार ही माझ्यासाठी प्राथमिक गोष्ट आहे आणि आपला परिवार वाढावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते, ती माझीही आहे. माझी आई आणि मी एखाद्या लहान मुलाची जबाबदारी चांगल्या पद्धतीनं पार पाडू शकतो’.
४१ वर्षीय करण अविवाहीत आहे. नुकताच त्यानं आपला ४१ वा वाढदिवस मोठ्या धडाक्यात साजरा केला. त्याच्या या सेलिब्रेशनसाठी जवळजवळ संपूर्ण बॉलिवूडच उपस्थित होतं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 29, 2013, 16:26