Last Updated: Sunday, December 16, 2012, 16:27
www.24taas.com, मुंबईसध्या बॉक्स ऑफिसची मल्लिका समजल्या जाणाऱ्या करीना कपूर आपली जवळची मैत्रीण आणि दबंग २ची सहनिर्माती असणाऱ्या मलायका आरोरा-खान हिचं तोंड भरून कौतुक करत आहे.
दबंग २ मधलं फेव्हिकॉल से.. हे आयटम साँग सध्या सगळीकडेच धुमाकूळ घालतंय. सैफ अली खानशी लग्न केल्यानंतर करीनाने हाती घेतलेलं पहिलं काम म्हणजे हे आयटम साँग. मात्र या गाण्याची नृत्यदिग्दर्शिका फराह खान असूनही करीना मात्र मलायकाचं गुणगान करत आहे.
पत्रकारांशी बोलताना करीना म्हणाली, “फेव्हिकॉल से.. हे गाणं नृत्यदिग्दर्शिका फराह खानने बसवलंय. तिच्यासोबत काम करायला मला नेहमीच वडतं. पण या गाण्याच्या यशाचं खरं श्रेय जातं, ते माझी मैत्रीण आणि दबंग-२ ची निर्माती असणाऱ्या मलायका आरोरा- खान हिलाच. या गाण्यातील कपडे, वस्तू, रंगसंगती . सगळ्या गोष्टींवर बारीक लक्ष ठेवून तिनेच हे गाणं एवढं प्रेक्षणीय केलं आहे. त्यामुळे या गाण्याच्या यशामागे मलायकाच आहे.”
First Published: Sunday, December 16, 2012, 16:27