Last Updated: Wednesday, June 18, 2014, 22:51
www.224taas.com, झी मीडिया, मुंबईबॉलीवूडची सदाबहार अभिनेत्री करीना कपूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका पार्टीत करिनाच्या ‘साडी’ला लागलेली सेफ्टी पिन, हा यावेळी चर्चेचा विषय ठरलाय.
अरमान जैन हा करीनाचा चुलत भाऊ आहे, अरमानचा पहिला वहिला चित्रपट ‘लेकर हम दिवाना दिल’ लवकरच प्रदर्शित होतोय.
या चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चसाठी करीना साडीत आली होती. पांढरी साडी आणि त्यावर काळा ब्लाऊज असा वेश करीनाचा होता.
साडीवाल्या लूकमुळे करीनावर पार्टीत उपस्थितांच्या नजरा वळल्या. मात्र करीनाच्या या लूकमध्येही त्यांच्या नजरा पुन्हा पुन्हा सेफ्टी पिनवर जात होत्या.
ब्लाऊजला सेफ्टी पिन लावल्याने करीनाच्या या लूकची सारी शोभाच गेली, कारण करीनानं घातलेल्या काळ्या ब्लाऊजला मोठ्या सेफ्टी पिनचा आधार देण्यात आला होता.
करिना आता यापुढे अशा सेफ्टी पिनचा आधार घेणार नाही की, ज्यामुळे तिच्या सौंदर्यावर चार चाँद न लागता, चार नजरा खिळून राहतील.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, June 18, 2014, 22:51