करिष्मा आणि संजयच्या मदतीला धावला सैफ!karishma and sanjay kapoor file for divorce by mutual consent

करिष्मा आणि संजयच्या मदतीला धावला सैफ!

 करिष्मा आणि संजयच्या मदतीला धावला सैफ!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूर आणि तिचा नवरा संजय कपूर आता एकमेकांच्या सहमतीनं घटस्फोट घेणार आहे. दोन्ही मुलांच्या कस्टडीसाठी संजयनं केलेला अर्ज आता त्यानं वापस घेतलाय. दोघांनी मुंबईतल्या वांद्रे फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केलाय. कोर्टानं शनिवारी तब्बल 6 तास दोघांसोबत मीटिंग घेतल्यानंतर हा निर्णय त्यांनी घेतला.

यावेळी या दोघांव्यतिरिक्त मीटिंगला प्रिन्सिपल जज, सैफ अली खान आणि करीना कपूरही उपस्थित होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संजय आणि करिष्मामध्ये तडजोड करवण्यामध्ये सैफची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. संजय आणि करिष्माला दोन मुलं आहेत. समायरा 9 वर्षांची आणि किआन 4 वर्षाचा आहे.

 तडजोडीनुसार संजय कपूर आणि करिष्मा कपूरला मुलांसोबत पुरेसा वेळ मिळावा.
 जॉईंट लिगल गार्जियनशिपनुसार मुलांबाबत कोणत्याही बाबतीत संजय आणि करिष्मा मिळून निर्णय घेतील.
 मुलांची कस्टडी करिष्मा कपूरला मिळाली.
 या दोघांनी आता घटस्फोटाचा अर्ज केलाय. 6 महिन्यांच्या आत त्यांना घटस्फोट मिळेल.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, June 2, 2014, 10:14


comments powered by Disqus