कोण आहे करिश्मा कपूरचा नवा मित्र?, karishma kapoor found new special friend

कोण आहे करिश्मा कपूरचा नवा मित्र?

कोण आहे करिश्मा कपूरचा नवा मित्र?
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांचा घटस्फोट होऊन आता अनेक दिवस उलटलेत. पण, आता करिश्माच्या आयुष्यात एका नव्या मित्राची एन्ट्री झालीय.

सध्या करिश्माचं आयुष्य नवीन नवीन गोष्टींचा आनंद घेण्यात सुरू आहे. मुलांसाठीही ती तितकाच वेळ देते. परंतु, सोबतच करिश्मा आपल्या एका खास मित्रासोबत बराच वेळ व्यतीत करत आहे. करिश्माचा हा नवीन मित्र एका कंपनीचा सीईओ आहे.

पती संजय कपूरशी संबंध तोडल्यानंतर करिश्मा गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतच आपल्या आईच्या घरी राहत आहे. दोन मुलांनंतरही करिश्मा आणि संजयचे संबंध काही सुधारण्याचे चिन्ह नव्हते. संजयचं नाव अनेक वेळा अनेक महिलांसोबत जोडलं जाताना दिसतं. ज्यामुळे करिश्मा अनेक दिवस चिंताग्रस्त होती. त्यानंतर तिनं संजयपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

सूत्रांच्या माहितीनुसार, करिश्माच्या आयुष्यात आता एक असा व्यक्ती आलाय ज्याच्यासोबत ती खूप खूश आहे. अनेकदा या दोघांना फिरताना पाहिलं गेलं आहे. हॉटेल्स, रेस्टोरंटस् आणि अनेक पार्ट्यांमध्येही हे दोघे जण अनेकदा एकत्रच दिसतात.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, September 3, 2013, 12:04


comments powered by Disqus