Last Updated: Tuesday, November 20, 2012, 21:05
www.24taas.com, मुंबई अभिनेत्री करिश्मा कपूर आणि तिचा पती उद्योगपती संजय कपूर या दोघांनी सरतेशेवटी वेगवेगळं राहण्याचा निर्णय घेतलाय. एका बातमीनुसार या दोघांचा घटस्फोट घेण्याचा निर्णय पक्का झालाय आणि काही दिवसांतच ते कायदेशीर घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.
बॉलिवूडच्या काही सूत्रांच्या माहितीनुसार एका दैनिकानं हा खुलासा केलाय. या वृत्तानुसार, करिश्मा आणि संजय यांचा घटस्फोट याअगोदरच झालेला आहे फक्त औपचारिक घोषणा होणं बाकी आहे. दोघांनी वेगवेगळं राहण्याचा निर्णय घेतलाय. निर्णय उरलाय तो या दोघांच्या मुलांबाबत. दोघांनाही मुलांना आपल्याबरोबर ठेवण्याचा समान अधिकार मिळावा... आणि दोघांकडेही मुलांना आळीपाळीनं राहता यावं, याबद्दल निर्णय बाकी आहे.
संजय आणि करिश्मा यांची दोन्ही मुलं अजून लहान आहेत, त्यामुळे ही मुलं दोन शहरांत कशी काय राहू शकतील, यावर दोघांचं एकमत व्हायचं अजून बाकी आहे. करिश्मा कपूर ही सध्या मुंबईत स्थायिक झालीय तर संजय दिल्लीत राहतो. यासंबंधी दोघांचं एकमत झालं की दोघंही कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार आहेत.
करिश्मा आणि संजय या दोघांचं नातं नेहमीच वादात अडकलेलं राहिलंय. २००५ मध्येही पहिलं मूल झाल्यानंतर ती संजयपासून वेगळं राहत होती. त्यानंतर २०१० मध्ये काही तडजोडीनंतर दोघांनी पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. याच वर्षी त्यांना दुसरं मूल झालंय.
काही वर्षांर्वी संजय कपूर याचं दिल्लीच्या प्रिया चटवाल हिच्याबरोबर नावं जोडलं गेलं होतं. त्यांच्या अफेअरसंबंधी अनेक बातम्याही आल्या होत्या. त्यानंतर करिश्मा आणि संजय यांचं नातं हेलकावे खातंय.
First Published: Tuesday, November 20, 2012, 21:01