Last Updated: Tuesday, May 13, 2014, 10:56
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईकतरिनाची बहीण इसाबेला कैफ सलमानच्या होम प्रॉडक्शन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात तरी इसाबेला हॉलिवूड चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
तिच्या कुटुंबियांनी आणि जवळच्या सूत्रांनी याला अधिकृत दुजोरा देत सांगितलं की, इसाबेलचा पहिला चित्रपट कॅनेडियन असून त्याचं नाव `डॉ. कॅबी` आहे. चित्रपट पूर्ण झाला असून तो प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. इसाबेलच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामागं कतरिनाचा हात आहे.
कपूर बहिणी (करिश्मा आणि करिना) सोडल्या, तर दुसर्या कोणत्याही बहिणीची जोडी बॉलिवूडमध्ये यशस्वी होऊ शकली नाही. शिल्पा-शमिता, ट्विंकल-रिंकी, रिया-राइमा, समीरा-सुषमासारख्या बहिणींच्या जोडीमध्ये छोट्या बहिणीचा करिअर आलेख उतरता राहिलेला आहे.
मोठ्या बहिणीच्या करिअरचा लहान बहिणीच्या करिअरवर चांगला परिणाम झालेला दिसलेला नाही त्यामुळं इसाबेलसोबत असं होऊ नये म्हणून कतरिनानं हा निर्णय घेतला आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, May 13, 2014, 10:56