Last Updated: Friday, February 21, 2014, 15:03
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई `कॉफी विथ करण` या कार्यक्रमात कतरीनाला `भाभी` म्हणून संबोधत करीनानं कॅटचा रोष ओढावून घेतला होता... आणि कॅटचा हाच राग अद्यापही शांत झालेला नाही.
आपल्या आणि रणबीरच्या नात्यात मध्येच नाक घुसडणाऱ्या करीनावर कॅट चांगलीच संतापली होती... `कॉफी विथ करण` या कार्यक्रमातील आपल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी याआधीही बेबोनं कॅटला फोन केला होता. पण, कॅटचा राग काही निवळला नव्हता. त्यामुळे करिनानं पुन्हा एकदा फोन करून कतरीनाला सगळं काही स्पष्ट करून सांगितलंय.
काही दिवसांपूर्वी, करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये करीना कपूर आणि रणबीर कपूर ही भावा-बहिणीची जोडी एकत्रित उपस्थित होती. याच शोमध्ये करीनाने कतरीनाला ‘वहिनी’ म्हणून संबोधलं होतं. रणबीरच्या लग्नात आपण चिकणी-चमेली या गाण्यावर थिरकणार, असंही करीनानं जाहीर करून टाकलं होतं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, February 21, 2014, 15:03