Last Updated: Monday, July 1, 2013, 18:40
www.24taas.com, झी मीडिया, हॉलिवूडपरदेशी रिऍलिटी शोमधून स्टार बनलेल्या किम कारदाशियाँ आणि तिच्या बॉयफ्रेंडच्या पोरीची पहिली झलक मिळवण्यासाठी जगभरातल्या माध्यमांमध्ये स्पर्धा रंगली होती. मात्र या बाळाच्या फोटोसाठी २० लाख डॉलर्स देऊन एका नियतकालिकाने बाजी मारली आहे.
आई वडील जर प्रसिद्धी क्षेत्रात असले तर साहजिकच मुलांनाही प्रसिद्धी मिळते आणि या लोकांच्या खाजगी जीवनाबद्दल जाणून घेण्यासाठी तसंच त्यांच्या मुलांबद्दल जाणून घेण्यासाठी सारेच उत्सुक असतात. त्यासाठी कितीही किंमत मोजायला तयार असतात.
ह़ॅालीवूडमधील रिअॅलिटी स्टार किम कारदाशियां आणि तिचा प्रियकर कान्ये वेस्ट याच्या कन्येच्या पहिल्या फोटोसाठी त्यांना २० लाख अमेरिकन डॉलर देण्यात येणार आहेत. सुरुवातीला किम कारदाशियां आणि तिचा प्रियकर कान्ये वेस्ट यांच्या मुलीला एका टॉकमधून लोकांसमोर आणलं जाणार होतं. मात्र त्यांनी आता हा विचार बदललाय.
एका रिपोर्टनुसार असं सांगितल जातंय किम कारदाशियांने टॉक शोपेक्षा विशेष फोटोशूट करण्याच ठरवलं आहे आणि यासाठी एक नियतकालिक तिला २० लाख अमेरिकन डॉलर देणार आहे. त्यामुळे किमची ही पोरगी जन्मतःच सेलिब्रिटी बनली आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, July 1, 2013, 18:40