Last Updated: Friday, December 13, 2013, 18:57
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली दरवर्षी निघणारं `फोर्ब्स` सेलिब्रेटी मासिकामध्ये सेलिब्रेटींचं अव्वल स्थान मिळवण्यासाठी चांगलीच चुरस लागते. गेल्यावर्षी हे अव्वल स्थान बॉलिवूडच्या बादशहाला म्हणजेच शाहरूख खानला मिळालं होतं आणि यंदाही त्यानं आपलं अव्वल स्थान कायम ठेवलंय. पुन्हा एकदा बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानला `फोर्ब्स` मासिकानं जाहीर केलेल्या भारतातील सेलिब्रेटींच्या यादीत अव्वल स्थान मिळालंय.
या मासिकात देशातील क्रिकेटपटू, बॉलिवूडचे स्टार आणि मोठ्या दिग्गजांचा समावेश करण्यात येतो. यंदा बादशहानं या सर्वांना मागं टाकत अव्वल स्थान पटकवलंय. या मासिकाच्या यादीत दुसरं स्थान भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यानं मिळवलंय. तर दबंग म्हणून ओळखला जाणारा सलमान खान हा तिसऱ्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी सलमान यादीत दुसऱ्या स्थानी होता.
परंतु यंदा धोनीनं एका स्थानाची प्रगती करत दुसरं स्थान मिळविलंय. तसंच या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर चौथ्या स्थानावर आहे. तर बिग बी अमिताभ बच्चन पाचव्या स्थानी आहे. युवा सेलिब्रेटींच्या यादीत भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली ही अव्वल स्थानी आहे.
तसंच याच यादीत हृतिक रोशन आणि रणबीर कपूर यांनाही स्थान देण्यात आलंय आणि पहिल्या दहा जणांच्या यादीत कतरिना कैफचंही नाव आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, December 13, 2013, 18:51