फोर्ब्सच्या यादीत रिलायन्स, एसबीआय अव्वल

Last Updated: Friday, May 9, 2014, 18:04

जगातील सर्वात मोठी आणि सर्वात शक्तीशाली 2 हजार कंपन्यांची नामावली फोर्ब्सने जाहीर केली आहेत. यात 54 कंपन्यांचा समावेश आहे.

`फोर्ब्स`च्या यादीत सेलिब्रेटींमध्ये किंग खान अव्वल!

Last Updated: Friday, December 13, 2013, 18:57

दरवर्षी निघणारं `फोर्ब्स` सेलिब्रेटी मासिकामध्ये सेलिब्रेटींचं अव्वल स्थान मिळवण्यासाठी चांगलीच चुरस लागते. गेल्यावर्षी हे अव्वल स्थान बॉलिवूडच्या बादशहाला म्हणजेच शाहरूख खानला मिळालं होतं आणि यंदाही त्यानं आपलं अव्वल स्थान कायम ठेवलंय. पुन्हा एकदा बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानला `फोर्ब्स` मासिकानं जाहीर केलेल्या भारतातील सेलिब्रेटींच्या यादीत अव्वल स्थान मिळालंय.

बिल गेट्स अमेरिकेतील सर्वात मोठा परोपकारी!

Last Updated: Wednesday, November 20, 2013, 13:26

फोर्ब्सनं नुकतीच अमेरिकेतल्या ५० परोपकारी व्यक्तींची यादी जाहीर केलीय. या यादीत नंबर १ वर आहे मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा. अमेरिकेतील सर्वात मोठे समाजसेवी आणि देणगीदार हे दोघं ठरले आहेत.

धोनी यंदाही मालामाल, फोर्ब्सच्या यादीत १६वा!

Last Updated: Tuesday, August 20, 2013, 10:54

भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान महेंद्र सिंग धोनी हा फोर्ब्सच्या यादीत सगळ्यात जास्त कमावणारा खेळाडू म्हणून १६व्या स्थानी पोहोचलाय. जून २०१२ ते जून २०१३ दरम्यान धोनीनं ३.१५ कोटी डॉलर म्हणजेच जवळपास १८० कोटींची कमाई केली.

मारिया शारापोव्हा फोर्ब्सच्या यादीत अव्वल

Last Updated: Wednesday, August 7, 2013, 15:49

जगात सर्वाधिक पैसा कमावणारी खेळाडू म्हणून प्रसिद्ध टेनिसपटू मारिया शारापोव्हानं फोर्ब्सच्या यादीत अव्वल स्थान पटकावलंय. रशियाची स्टार खेळाडू असलेल्या शारापोव्हानं तब्बल नवव्या वर्षी आपलं स्थान कायम ठेवलंय.

फोर्ब्सच्या यादीत `टीव्ही क्वीन` प्रथम क्रमांकावर!

Last Updated: Thursday, June 27, 2013, 11:51

फोर्ब्सच्या वार्षिक पत्रिकेत लेडी गागा, स्टीव्हन स्पीलबर्ग आणि मॅडोना या सेलिब्रिटींना मागे टाकत ‘टीव्ही क्वीन’ ऑपरा विन्फ्रे हिनं जागा मिळवलीय.

फोर्ब्सच्या यादीत भारतातल्या आठ जणींचा समावेश...

Last Updated: Sunday, March 3, 2013, 13:11

अमेरिकेच्या फोर्ब्स मॅगझिनमध्ये यावेळी ५० महिला व्यावसायिकांचा समावेश करण्यात आलाय. यामध्ये भारतातल्या तब्बल आठ महिलांनी स्थान पटकावलंय.

कमाईमध्येही शाहरूखच 'किंग'!, फोर्ब्सच्या यादीत पहिला

Last Updated: Friday, January 25, 2013, 15:07

अभिनयासोबतच कमाई आणि लोकप्रियतेतही शाहरुख किंग असल्याचं समोर आलं आहे.

`फोर्ब्स`च्या कव्हर पेजवरचा पहिला भारतीय अभिनेता...

Last Updated: Thursday, January 24, 2013, 10:12

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची लोकप्रियता फक्त देशातच नाही तर परदेशांतही चर्चेचा विषय ठरलाय. काही ना काही कारणामुळे शाहरुख नेहमीच चर्चेत असतो. मिळालेल्या माहितीनुसार, जगभरात प्रसिद्ध असलेल्या ‘फोर्ब्स’ मॅगझिनच्या कव्हरपेजवर शाहरुख खानचं वर्चस्व दिसणार आहे.

फोर्ब्जवरही प्रभाव... मनमोहन सिंग आणि सोनियांचा

Last Updated: Thursday, December 6, 2012, 13:26

फोर्ब्स मॅग्झिननं प्रसिद्ध केलेल्या जगातल्या सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये पंतप्रधान मनमोहनसिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचा समावेश करण्यात आलाय. बराक ओबामांनी याही वेळेस प्रथम स्थानावर कायम आहेत.

या वर्षीचे सर्वाधिक श्रीमंत भारतीय

Last Updated: Thursday, October 25, 2012, 11:58

सलग पाचव्या वर्षीही मुकेश अंबानी सर्वाधिक श्रीमंत भारतीय ठरले आहेत. फोर्ब्स मासिकाने नुकतीच श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर केली. यात मुकेश अंबानी पुन्हा अव्वाल स्थानावर आहेत. खरंतर गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्या संपत्तीत घट होत आहे. मात्र नुकसान होत असूनही त्यांची संपत्ती २१ अब्ज डॉलर्स एवढी अहे.

अमेरिकेतील श्रीमंत बिल गेट्स

Last Updated: Thursday, September 20, 2012, 14:16

अमेरिकेतील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी पुन्हा बाजी मारली आहे. आपण श्रीमंतीत बलाढ्य असल्याचे दाखवून दिले आहे. त्यांनी हा मान सलग १९ व्या वर्षी पटकावला आहे.

सोनिया गांधींनी टाकलं मिशेल ओबामांनाही मागे!

Last Updated: Thursday, August 23, 2012, 13:17

`फोर्ब्स मॅग्झीन`ने जगातील शक्तीशाली शंभर महिलांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांच्या पत्नी मिशेल ओबामांना मागे टाकलंय.