Last Updated: Tuesday, December 10, 2013, 19:01
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई सिनेनिर्माता करन जोहर पुन्हा एकदा आपल्या टॉक शोमधून सेलिब्रिटीजला मोकळ्या गप्पा मारायला भाग पाडताना दिसतोय. त्यामुळेच त्याचा ‘कॉफी विथ करन’ हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आहे. नुकत्याच, झालेल्या भागात करनसोबत दिसले करीना कपूर आणि रणबीर कपूर... याच निमित्तानं, छोट्या पडद्यावर पहिल्यांदाच या चुलत बहिण-भावाच्या जोडीला एकत्र पाहायला मिळालं. यावेळी करनसोबत गप्पा मारताना या दोघांनी चांगलेच मनोरंजक किस्सेही शेअर केले.
या टॉक शोमध्ये करीनानं आपल्या भावाची टांग खेचण्याची एकही संधी सोडली नाही. करीनानं उघड-उघडपणे कतरीना कैफचं नाव घेऊन रणबीरला चांगलंच पेचातही पाडलं. कतरीनाचं नाव घेतल्यानंतर रणबीर अनेकदा गालातल्या गालात हसतानाही दिसला. पण, रणबीरनंही सफाईदारपणे करननं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली.
यावेळी, करननं रणबीरला सलमान खानबद्दलही प्रश्न विचारले... यावर रणबीरनं आपणही ‘दबंग’ स्टारचं खूप कौतुक करत असल्याचं सांगितलं. रणबीर म्हणतो, ‘सलमान सरांविषयी खूप चर्चा ऐकायला मिळते पण तो नेहमीच प्रेरणादायी राहिलाय. तो माझ्याबद्दलही चांगलंच विचार करतो. सलमान माझ्या पहिल्या सिनेमाचाही एक छोटा भाग होता’.
‘मी जेव्हा केव्हा सलमानला भेटतो तेव्हा तो माझ्याशी खूप प्रेमळपणे संवाद साधतो. मला वाटतं, की आमच्याबद्दल मीडियामध्ये खूप काही लिहिलं जातं त्यामुळे अनेकदा अनेक गैरसमज निर्माण होतात... ज्यांचा वास्तवात काहीही संबंध नसतो’, असंही रणबीरनं यावेळी म्हटलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, December 10, 2013, 19:01