‘क्रिश ३’ च्या ट्रेलरची इंटरनेटवर धूम krish 3 hits to internet

‘क्रिश ३’ च्या ट्रेलरची इंटरनेटवर धूम

 ‘क्रिश ३’ च्या ट्रेलरची इंटरनेटवर धूम
www.24taas.com

‘क्रिश ३’ या सिनेमाचा ट्रेलर आताच इंटरनेटवर लॉन्च झाला आणि या काही दिवसातांच ‘क्रिश ३’ चर्चेत आला. राकेश रोशनने निर्देशित केलेला हा सिनेमा आतापासूनच हीट झाल्याचे दिसते. हा सिनेमा कृश सिरिजचा तिसरा सिनेमा आहे.

राकेश रोशनने दिगदर्शित केलेल्या या सिनेमाचा ट्रेलर इंटरनेटवर आताच लॉन्च झाला असून या सिनेमाला यू ट्यूबवर १३००० यूजरने लाईक केले आहे तर जवळजवळ ८ लाख लोकांनी हा ट्रेलर पाहिला आहे. या सिनेमात हृतिक रोशन, कंगना राणावत, विवेक ओबोरॉय हे प्रमुख भूमिकेत आहेत.

‘क्रिश ३’ या सिनेमात बॉलिवूडची कलाकार कंगना राणावत एक रोमँन्टिक गाणे गायली आहे, ज्याचे कौतुक करणात संगितकार राजेश रोशन मागे हटले नाही. सिनेमामध्ये कंगना नकारात्मक भूमिका साकारणार आहे. तसेच हृतिक रोशन हा प्रमूख भूमिकेत आहे. त्यांने सांगितले की, “हा एक अॅक्शन सिनेमा आहे. राकेश रोशनला जर एखादा व्यावसायिक सिनेमा करायला सांगितला तर ते तो करणार नाही त्यांना ते आवडत नाही. त्यांना त्यांचा एक निकष निर्धारित केला आहे” राजेश रोशनने सांगितले की, सिनेमाचे एक गाणे तयार करण्यासाठी पूर्ण एक महिना लागला आणि ते गाने पूर्णपणे तयार करण्यासाठी ५ ते ६ दिवस लागले.

‘क्रिश ३’ या सिनेमात विवेक ओबोरॉय आणि प्रियांका चोप्रा हेदेखील काम करणार आहेत. हा सिनेमा आता येत्या दिवाळीत म्हणजे ४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलर हीट झालाच आहे तर हा सिनेमा नक्कीच हीट ठरेल. आतापर्यत आलेले दोन्ही चित्रपट हीट झालेच आहेत त्यामुळे ‘क्रिश ३’ ची उत्सुकता लोकांना लागली आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, August 8, 2013, 11:25


comments powered by Disqus