Last Updated: Sunday, August 19, 2012, 23:19
www.24taas.com, मुंबईअभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या कुनिका लाल हिनं काँग्रेसच्याच एका आमदाराच्या मुलाविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली आहे. या मुलानं आपल्याबरोबर गैरवर्तन केल्याचा आरोप कुनिकानं केला आहे.
कुनिकानं आमदार बलदेव खोसा याचा मुलगा सिद्धार्थ खोसाविरोधात ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तर हे सगळे आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा सिद्धार्थ खोसानं केले आहेत.
त्यामुळे हे प्रकरण पोलिसात गेल्याने आता आमदारांच्या चिरंजीव सिद्धार्थ यांच्यावर काही कारवाई होणार का? याकडेच कुनिकाचे लक्ष लागून राहिले आहे.
First Published: Sunday, August 19, 2012, 23:19