Last Updated: Tuesday, November 27, 2012, 10:34
www.24taas.com, नवी दिल्ली ऑस्कर पुरस्कार विजेत्या ‘लाईफ ऑफ पाय’ या सिनेमानं भारतातल्या थिएटर्सच्या गल्ल्यावर पहिल्याच आठवड्यात आपला जम बसवलाय. आत्तापर्यंत या सिनेमानं तब्बल १९.५ करोड रुपयांची कमाई केलीय.
गेल्या शुक्रवारी ‘टू’डी आणि ‘थ्री’डी स्वरुपात प्रदर्शित झालेल्या या सिनेमानं पहिल्याच दिवशी तब्बल पाच करोडची कमाई केली होती. ती या आठवड्यात १९.५ करोड रुपयांवर पोहचलीय.
‘लाईफ ऑफ पाय’ या चित्रपटाची कथा यान मार्टेल या साहित्यकाराच्या कादंबरीवर आधारीत आहे. या सिनेमातील तरुण पायची भूमिका सूरज शर्मा या तरुणानं साकारलीय तर प्रौढ पाय साकारलाय इरफान खान यानं... सूरजनं या सिनेमातून आपल्या करिअरचा श्रीगणेशा केलाय. पायच्या आईच्या भूमिकेत तब्बूनं चोख कामगिरी बजावलीय.
भारतात इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा चार भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित झालाय. पाँडिचेरीमधील मन्नार या शहरातही या सिनेमाचा काही भाग चित्रित करण्यात आलाय. ‘अवतार’ या सिनेमानंतर ‘लाईफ ऑफ पाय’ सिनेमानं भारतात जबरदस्त सुरुवात केलीय.
First Published: Tuesday, November 27, 2012, 10:33