Last Updated: Tuesday, October 23, 2012, 23:13
www.24taas.com, नवी दिल्ली भारतीय वंशाची कॅनडाला जन्मलेली अभिनेत्री लिजा रे ही शेवटी विवाहबंधनात अडकलीय. लिजा रे हिनं नुकताच कॅन्सरवर विजय मिळवला होता. आता लिजानं जेसन देहनी याच्यासोबत कॅलिफोर्नियामध्ये आपला संसार थाटलाय. जेसन हा एक बँक एक्झिक्युटिव्ह आहे.
२० ऑक्टोबर रोजी जेसन आणि लिजानं गग्नगाठ बांधलीय. या लग्नाचं रिसेप्शन भारतात पार पडणार आहे. लग्नाच्या दिवशे लिजानं वेन्डेल रॉड्रीक्स यानं डिझाईन केलेला ड्रेस परिधान केला होता. त्यानंतर मात्र तिनं सत्या पॉल यानं डिझाईन केलेली साडी घातली होती. या लग्नासाठी जवळपास ११० मंडळींची उपस्थिती होती.
बँक एक्झिक्युटिव्ह असलेल्या जेसन याच्याबरोबर लिजा काही दिवसांपासून डेटींग करत होती. या फेब्रुवारीमध्ये जेसननं अचानकच लिजासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता.
First Published: Tuesday, October 23, 2012, 15:50