रणबीर - कतरीनाच्या फोटोवर सलमान म्हणतो..., look whats salman saying on ranbeer katrina`s photo

रणबीर - कतरीनाच्या फोटोवर सलमान म्हणतो...

रणबीर - कतरीनाच्या फोटोवर सलमान म्हणतो...
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सलमान खान आणि कतरीना कैफ यांची नावं एकमेकांशी जोडलं जाऊन आता एक काळ लोटलाय. या जोडीला प्रेक्षकांची पसंतीही मिळाली. पण, आता मात्र कतरीना आणि रणबीरची जोडी फॉर्ममध्ये आहे. दोघांनी स्पेनमध्ये घालवलेले दिवस काही फोटोंच्या माध्यमातून समोर आल्यानंतर तर जास्तच... याच फोटोंवर सलमानची काय प्रतिक्रिया असेल बरं...

प्रेक्षकांची हिच जिज्ञासा फिल्मी पत्रकारांनाही आहेच की... म्हणूनच हा विषय एका पत्रकारानं छेडलाच. रणबीर आणि कतरीनाचा स्पेनच्या समुद्रकिनाऱ्यावरच्या फोटोवर सलमानची काय प्रतिक्रिया आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न या बिचाऱ्यानं केला.

सध्या हैदराबादमध्ये आपला आगामी सिनेमा ‘मेंटल’चं शूटमध्ये सलमान व्यस्त आहे. त्याला जेव्हा हा प्रश्न विचारला गेला तेव्हा सलमान रागानं लालबुंद झाला. आपल्या रागासाठी चांगलाच परिचित असलेल्या सलमानचा पारा पुन्हा एकदा चढला होता. त्यानं पत्रकाराला शिव्यांची चांगलीच लाखोली वाहिली तीही उपस्थितांसमोर...

तेव्हा उपस्थित इतर पत्रकारांनाही समजलंय की सलमानला या मुद्यावर आपलं तोंड उघडायचं नाहीए.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, August 1, 2013, 15:50


comments powered by Disqus