Last Updated: Tuesday, December 24, 2013, 16:22
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई बॉलिवूडचं हॉट कपल म्हणून ओळखले जाणारे रणबीर कपूर आणि कतरीना कैफ यांनी भले आपांपसातील नातं सार्वजनिक करण्यास नकार दिला असेल पण हे नातं अजूनही जुळलेलं असल्याचंच वारंवार समोर आलंय. प्रेमात बुडालेल्या या जोडप्याला अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहिलं गेलंय.
नुकतंच, या दोघांना ‘टायटानिक’फेम लियोनार्डो डीकॅप्रियो याचा ‘द वॉल्फ ऑफ वॉल स्ट्रीट’ या सिनेमाच्या स्क्रिनिंगमध्ये एकत्र पाहिलं गेलं. दोघांनी हा सिनेमा एकत्र पाहिला आणि त्यानंतर तिथून निघून गेले.
रणबीरनं यावेळेला स्लेटी रांगाचा ट्रॅक सूट तर कतरीनानं काळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. रणबीरनं लाल रंगाची टोपीही घातली होती. सिनेमा संपल्यानंतर दोघंही खूप आनंदात दिसत होते. परंतु, दोघांपैकी एकानंही यावेळेस मीडियाशी संवाद साधला नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, कतरीना आणि रणबीर आपलं न्यू इअर अमेरिकेत सेलिब्रेट करणार आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, December 24, 2013, 16:22