Last Updated: Friday, March 29, 2013, 11:25
www.24taas.com, नवी दिल्ली बॉलिवूडमध्ये अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांची काहीशी हटके जोडी अनेकांना भावलीय... एका दशकाहून अधिक काळ या जोडीला एकत्र पाहण्यात प्रेक्षकांनाही बरं वाटतं... आणि काजोल आयुष्यात आहे, म्हणून तर अजय स्वत:ला लकी समजतोय.
काजोलचं आपल्या आयुष्यातील असलेल्या महत्त्वाच्या स्थानाबद्दल बोलताना अजय म्हणतो, ‘काजोलला माझ्या आयुष्यात आहे, ती माझी सहचारिणी आहे म्हणून मी लकी आहे. ती माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणारी माझी सपोर्ट सिस्टिमच आहे.’
काजोल आणि अजय यांनी १९९९ साली लग्नगाठ बांधली आणि ती आजतागायत मोठ्या खूबीनं टिकवून ठेवलीय. इश्क, प्यार तो होना ही था, यू मी और हम यांसारख्या चित्रपटात ही जोडी प्रेक्षकांना एकत्र दिसली. या जोडीच्या ऑन स्क्रिन केमिस्ट्री इतकीच ऑफ स्क्रिन केमिस्ट्रीही लोकांच्या पसंतीस उतरलीय.
मुलगी न्यासा आणि मुलगा युग ही अजय-काजोल या वेलीवरची दोन फुलं... ‘यूटीव्ही स्टार’वरच्या ‘ये हैं मेरी कहानी’ या कार्यक्रमात ४३ वर्षीय अजय आपली कहानी सांगत होता.
First Published: Friday, March 29, 2013, 11:25