Last Updated: Sunday, June 2, 2013, 09:50
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईअभिनेत्री विद्या बालन अभिनीत ‘इश्किया’ चा सिक्वल ‘डेढ इश्किया’मध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित अभिनेता नसरुद्दीन शाहसह काही विचित्र दृश्य करणार आहे.
२०१० मध्ये ‘इश्किया’ चित्रपटात विद्या बालन आणि अरशद वारसी यांच्यात काही विचित्र दृश्य चित्रित करण्यात आले होते. त्याच्या सिक्वलमध्ये आता माधुरी आणि नसरुद्दीन काही उत्तेजक दृश्यात आपल्याला दिसणार आहे.
दिग्दर्शक अभिषेक चौबे यांनी सांगितले की, विचित्र दृश्यांचे शुटिंग सोपे नसते. कलाकरांना माझ्या दृष्टीकोनावर विश्वास असणे आवश्यक आहे. तसेच मला त्यांना विश्वास दाखवायचा असतो की, त्यांना अभिनेत्री आणि इतर कलाकारांना खालची वागणूक देत नाही आहे. तसेच या चित्रपटात अभिनेत्री हुमा कुरेशी आणि अरशद वारसी हे देखील काही कामुक दृश्यांमध्ये दिसणार आहे.
First Published: Sunday, June 2, 2013, 09:50