Last Updated: Thursday, September 26, 2013, 09:30
www.24taas.com , झी मीडिया, मुंबईमाधुरी दीक्षित ‘गुलाब गँग’ या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या सिनेमातून माधुरीचा हटके लूक पहायला मिळणार आहे.
धकधक गर्ल माधुरी दिक्षीत कायमच प्रेक्षकांच्या मनाची धकधक ठरलीये. आजवर अनेक सिनेमातून आपण तिला वेगवेगळ्या भूमिकेत पाहिलंय. मग ती ‘हम आपके है कौन’ मधली चुलबुली निशा असो किंवा ‘देवदास’ मधली चंद्रमुखी असो, माधुरीनं नेहमीच तिच्या अदाकारीनं प्रेक्षकांचं मन जिंकलयं.
मात्र, आता ‘गुलाब गँग’ या आगामी सिनेमातून माधुरी एका हटके भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘गुलाब गँग’ सिनेमाचं कथानक एका सत्य घटनेवर आधारित आहे. त्यामुळं या सिनेमात माधुरी चक्क फायटिंग स्टंट्स करताना पाहायला मिळणारे. या अँक्शन सिन्ससाठी माधुरीनं खास ट्रेनिंगही घेतलंय. तेव्हा माधुरीचा गुलाब गँग मधला हा एग्रेसिव्ह लूक प्रेक्षकांच्या किती पसंतीस पडतो हेच पहायचं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, September 26, 2013, 09:30