Last Updated: Tuesday, October 15, 2013, 13:55
www.24taas.com, पीटीआय, मुंबईआपल्या रिअॅलिटी शो `द बॅचलरेट इंडिया- मेरे खयालों की मलिका` मधून मल्लिका शेरावतनं आपला जोडीदार निवडलाय. तिनं एका स्पर्धकाचा लग्नाचा प्रस्ताव मान्य केलाय.
कोणतीही पूर्व तयारी न करता या शोदरम्यान स्पर्धकांना मल्लिकाच्या मनावर त्यांची छाप पाडायची होती. या शोमध्ये एकूण 30 जणांनी सहभाग घेतला होता, त्यातले 15 बॅचलर स्पर्धेत निवडल्या गेले. त्यातल्याच जश्न सिंह यानं मल्लिकाचा हात हातात घेऊन अगदी `फिल्मी स्टाईल`मध्ये तिला प्रपोज केलं.
जश्नच्या प्रपोज करण्याच्या पद्धतीनं मल्लिका भलतीच प्रभावित झाली. हा टास्क पूर्ण झाल्यानंतर मल्लिकाच्या या निर्णयामुळं प्रत्येक जण आश्चर्यचकित झाला होता.
काही दिवसांपूर्वीच मल्लिकानं मॉडेल-अॅक्टर असलेल्या किरण सागू याच्या गालावर किस केला होता. १५ स्पर्धकांपैकी या स्पर्धकानं मल्लिकाचं लक्ष वेधून घेतल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
`द बॅचलरेट इंडिया- मेरे खयालों की मल्लिका` हा शो अमेरिकेच्या एका रिअलिटी शोवर आधारित आहे. या शोमध्ये सिंगल बॅचलरेटला १५ स्पर्धक इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतात.
लाईफ ओकेवरील या शोच्या आधीही कलर्स चॅनेलवर अशाप्रकारचे रिअॅलिटी शो झाले होते. त्यात फक्त राहुल महाजन यानंच लग्न केलं इतरांना नाही. त्यामुळं आता मल्लिका शेरावत खरंच लग्न करते की नाही, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय.
First Published: Tuesday, October 15, 2013, 13:55