टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी द्रविड 'नॉट इंट्रेस्टेड'

Last Updated: Saturday, March 15, 2014, 11:18

टीम इंडियाच्या खराब कामगिरीमुळे कोच डंकन फ्लेचर हटाव मोहिमेला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर सुनील गावसकर यांनी फ्लेचर यांची हकालपट्टी करून राहुल द्रविड याला भारताचा कोच म्हणून नियुक्त करण्याचा सल्लाही `बीसीसीआय`ला दिलाय. मात्र, टीम इंडियाचा कोच म्हणून काम करण्यासाठी द्रविड फारसा उत्सुक नाही.

अखेर मल्लिकाला बॅचलरेट मिळाला!

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 13:55

आपल्या रिअॅलिटी शो `द बॅचलरेट इंडिया- मेरे खयालों की मलिका` मधून मल्लिका शेरावतनं आपला जोडीदार निवडलाय. तिनं एका स्पर्धकाचा लग्नाचा प्रस्ताव मान्य केलाय.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना ९० टक्के महागाई भत्ता मिळणार?

Last Updated: Thursday, September 19, 2013, 13:31

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. महागाई भत्यात (डीए) १० टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी धूमधडाक्यात साजरी होईल.

मुंबईचे करणार शांघाय, शहर पुनर्बांधणीचा प्रस्ताव

Last Updated: Saturday, June 22, 2013, 19:48

मुंबई, ठाण्यासह लगतच्या शहरांमधल्या अनधिकृत आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न गंभीर बनलाय... मुंब्रा इथल्या दुर्घटनेनंतर हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. त्यामुळं आता शहरांच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव सरकारनं तयार केलाय.

नवी मुंबई विमानतळाचा खर्च तिप्पटीनं वाढला

Last Updated: Tuesday, April 2, 2013, 16:49

नवी मुंबईचं प्रस्तावित विमानतळाचं काम आणखी लांबणीवर पडलयं. भूसंपादन पूर्ण झालं नसल्यानं विमानतळाच्या कामाला सुरुवात झाली नसल्याचं सरकारकडून सांगण्यात येतंय.

विधानभवनातील सीसीटीव्ही बिनकामाचे...

Last Updated: Saturday, March 30, 2013, 09:32

सचिन सूर्यवंशी मारहाण प्रकरणात विधान भवनातील सीसीटीव्ही कॅमेरात या मारहाणीचं स्पष्ट रेकॉर्डिंग झालीच नसल्याची माहिती आता पुढे आल्यानंतर आता चर्चा सुरू झालीय विधानभवनातील सीसीटीव्हींची...

रेल्वे अर्थसंकल्पात मुंबईसाठी काय?

Last Updated: Tuesday, February 26, 2013, 10:17

मुंबई आणि गर्दीनं खचाखच भरलेल्या लोकल आणि त्याला दिलेलं एक गोंडस नाव मुंबईच्या धमन्या... पण यापुढेही जावून मुंबईची लोकलची गर्दी कमी करायची असेल, प्रवास सुखकर करायचा असेल तर प्रस्तावित मेगा रेल्वे प्रकल्पांना मान्यता मिळण्याची गरज निर्माण झालीय.

`महाराष्ट्र देशा`... शिवसेनेकडून सत्तेचा गैरवापर?

Last Updated: Thursday, December 13, 2012, 08:26

शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे लिखित ‘महाराष्ट्र देशा’ हे पुस्तक मुंबई महापालिका शाळेत शिकणाऱ्या तीस हजार विद्यार्थ्यांना वाटण्याचा प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात सापडलाय.

गरिबांचा प्रवासही महागणार!

Last Updated: Friday, September 14, 2012, 09:44

केंद्र सरकारनं डिझेल दरात प्रति लिटर तब्बल पाच रूपयांची वाढ केल्यानं एसटीच्या इंधन खर्चात दररोज ६० लाख रूपयांची वाढ झालीय. त्यामुळे एसटीलाही लवकरच मोठी दरवाढ करावी लागणार आहे.

राज्यातील प्रस्तावित चार सेझ रद्द

Last Updated: Monday, July 30, 2012, 20:45

राज्यात चार प्रस्तावित सेझ रद्द करण्यात आलेत. महाराष्ट्र ओद्योगीक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच एमआयडीसीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मंत्रालय पाडा, पवारांच्या प्रस्तावाला खोडा!

Last Updated: Wednesday, June 27, 2012, 16:04

भीषण आगीत होरपळून निघालेल्या मंत्रालयाचे तळमजलासह एक, दोन आणि तीन हे मजले पूर्णपणे सुरक्षित असून चार, पाच आणि सहा हे तीन मजले सर्वसाधारणपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा तज्ज्ञांच्या समितीने दिला आहे. त्यामुळे ही इमारत पाडणार नसल्याचे जवळपास निश्‍चित आहे. त्यामुळे मंत्रालयाच्या इमारतीची पुनर्बांधणी करण्याचा शरद पवार यांनी दिलेला प्रस्ताव मागे पडण्याची शक्यता आहे.

पवारांच्या प्रस्तावानं भुजबळांना दणका

Last Updated: Saturday, June 23, 2012, 07:46

मंत्रालयाच्या जागी सरकारनंच नवी इमारत बांधावी अशी सूचना करत शरद पवारांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांच्या जुन्या प्रस्तावाला मूठमाती दिलीय.

गुटखाबंदीचा निर्णय पक्का

Last Updated: Wednesday, June 20, 2012, 16:15

राज्यात दोन दिवसांत गुटखाबंदी होणार आहे. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासनमंत्री मनोहर नाईक यांनी ही माहिती दिलीय. अन्न आणि औषध प्रशासन विभागानं हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला होता. दोन दिवसांत याबाबत औपचारिक घोषणा होणार आहे.

'राज' आधी चर्चा करा, मग तोडफोड करा- भुजबळ

Last Updated: Friday, June 15, 2012, 18:00

टोलच्या प्रश्नावर आधी चर्चा करा, आणि चर्चेनंतर काहीच झालं नाही, तर तोडफोड करा, असा सल्ला बाधंकाममंत्री छगन भुजबळांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना दिला आहे. राज्याची प्रगती व्हावी अशी इच्छा असेल तर आधी चर्चा करा, सुधारणेला आम्ही तयार आहोत.

समान पाणी प्रस्ताव योजनेतला अडथळा दूर

Last Updated: Wednesday, November 23, 2011, 05:29

पुण्याच्या समान पाणी प्रस्ताव योजनेला अखेर मुहूर्त मिळालाय. या योजनेसाठी चार वेळा निविदा फेटाळल्यानंतर पाचव्यांदा निविदा मंजूर करण्यात आलीय. निवडणुकीच्या तोंडावर तो ती मान्य करण्याचं शहाणपण महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांना सूचलंय.

अलिगढच्या उपकेंद्राला सेनेचा विरोध

Last Updated: Tuesday, October 25, 2011, 11:54

औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील शुलिभंजन इथे उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या उपकेंद्राला शिवसेनेने तीव्र विरोध केला आहे. शुलिभंजन हे दत्तात्र्याचे स्थान असून हिंदुचे पवित्र धर्मस्थळ आहे आणि या उपकेंद्राच्या उभारणीने जातीय तेढ निर्माण होईल अशी शिवसेनेची भूमिका आहे.