Last Updated: Wednesday, February 19, 2014, 11:18
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईपारंपरिक मराठी चित्रपटांच्या चौकटी मोडून काढणाऱ्या फॅण्ड्रीने पहिल्या तीन दिवसात दीड कोटी रूपयांचा गल्ला पार केला आहे.
फॅण्ड्री १४ तारखेला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित झाला आणि मुंबई, पुणे, नाशिक आणि सोलापूरमध्ये पहिल्या दिवसापासून या सिनेमाने हाऊसफुल्ल राहण्याचा मान मिळवला आहे.
सिनेमा बनवण्याचा अनुभव नसतांनाही दर्जेदार चित्रपटाची निर्मिती केल्याने दिग्दर्शक नागराज मंजुळेचंही हिंदी आणि इंग्रजी माध्यमातील समीक्षकांकडून कौतुक होत आहे.
समीक्षकांना आवडणारे चित्रपट हे कलात्मक असल्याने प्रेक्षकांना ते आवडत नाहीत, असा समज फॅण्ड्रीने खोडून काढला आहे.
मराठीतला कोणताही बडा चेहरा स्क्रीनवर नसतांनाही शालू आणि जब्याची ही कहाणी पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहाकडे धाव घेतली आहे, हे ही यात एक विशेष.
महाराष्ट्रातील १६३ चित्रपटगृहात फॅण्ड्रीचे दिवसाला २७५ शो सुरू आहेत. फॅण्ड्री हा मराठीत सिनेमा बनवण्याची इच्छा असणाऱ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, February 19, 2014, 09:34