Last Updated: Saturday, October 12, 2013, 11:13
www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली आमिर खानच्या आगामी चित्रपट `पीके`च्या एका युनिट दिग्दर्शकाला धार्मिक भावना दुखावल्याबद्दल अटक केली असल्याचे शुक्रवारी पोलीसांनी सांगितले. `पी.के.` चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान या युनिट दिग्दर्शकाने धार्मिक भावना दुखावणारे दृश्य चित्रीत केल्याप्रकरणी बुधवारी अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी या युनिट दिग्दर्शकाचे नाव सांगण्यास नकार दिला आहे. त्याला अटक करून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दिग्दर्शकाने एका रिक्षात दोन बुरखा परिधान केलेल्या स्त्रिया बसलेल्या असून ती रिक्षा भगवान शंकराच्या वेशातील कलाकाराकडून ओढत असल्याच्या दृश्याचे चित्रिकरण केले होते. या चित्रिकरणसंबंधी काही स्थानिकांकडून आक्षेप आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
युनिट दिग्दर्शक आणि तीन कलाकारांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दिल्लीतील चांदनी चौक परिसरात बुधवारी या दृश्याचे चित्रण करण्यात आले. सुरूवातीला तेथील लोकांना हे कलाकार ‘रामलीला’ सादर करणारे वाटले, मात्र कॅमेरा आदी शूटिंगचे साहित्य दिसल्यावर हे चित्रपटाचे चित्रण असल्याचे जमावाला लक्षात आले.
कलाकारांनी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केली असल्याचे आणि त्यासंबंधीची कागदपत्रेही असल्याचे सांगितले. मात्र त्याठिकाणी खूप मोठा जनसमुदाय जमा झाला आणि त्याजमावाने चित्रपटाच्या निर्मात्याविरोधी आणि धर्म भावना दुखावल्याच्या घोषणा दिल्या. तसेच देण्यास आणि पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली.
अभिनेता आमिर खान विरूध्द मात्र कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, October 12, 2013, 11:13