... आणि वाढदिवशीच रणबीर कपूर संतापला! "Mind your own bussiness", said bye Ranbir Kapoor to Media, On his Birt

... आणि वाढदिवशीच रणबीर कपूर संतापला!

... आणि वाढदिवशीच रणबीर कपूर संतापला!
www.24taas.com, एक्स्प्रेस वृत्तसेवा, मुंबई

तुला वाढदिवसाला कतरिनानं काय गिफ्ट दिलं? हा प्रश्न विचारताच अभिनेता रणबीर कपूर मीडियावर संतापला. शनिवारी रणबीरचा ३१वा वाढदिवस झाला. त्यामुळंच पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारला. मात्र तेव्हा `माइंड यूअर ओन बिझनेस` म्हणजेच तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा, असं रागावलेल्या रणबीरनं उत्तर दिलं.

कतरिना कैफ आणि रणबीर कपूर पुन्हा हॉलिडेसाठी परदेशी जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. याबाबत रणबीरला त्याला विचारलं असता, त्याचे फोटो प्रदर्शित झाल्यावर तुम्हाला कळेलच.. मी काय म्हणणार, असं रणबीरनं खोचक उत्तर दिलं.

अभिनेता रणबीर कपूर आणि कतरिना कैफ सध्या त्यांच्या स्पेनमधील फोटोंमुळं जास्त चर्चेत आहेत. सध्या रणबीर त्याच्या आगामी `बेशरम` चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, October 1, 2013, 14:03


comments powered by Disqus