Last Updated: Monday, March 31, 2014, 14:01
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा चित्रपटांव्यतिरिक्त सामाजिक कार्यातही तितकाच परफेक्ट असतो. नुकताच आमिरनं मरणोत्तर अवयवदान केलंय. शनिवारी केईएम रुग्णालयात आयोजित एका कार्यक्रमात आमिर हा निर्णय घेतला.
आमिर खान सध्या त्याच्या `सत्यमेव जयते` या कार्यक्रमाद्वारे समाजात एक नवा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित त्यातलंच त्याचं हे एक पाऊल असेल.
`जिवंत असताना तुम्ही चांगलं काम केलं नसेल, तर मृत्यूपूर्वी असं काही करा की लोकांच्या कायम स्मरणात राहील`, असं भावनिक आवाहन या वेळी आमिरनं केलं.
हल्लीच एका कार्यक्रमात आमिरची पत्नी किरण राव हिनंही अवयदान करणार असल्याचं म्हटलं होतं. तिला ही कल्पना `शीप ऑफ थिसस` या चित्रपटद्वारे आल्याचं तिनं सांगितलं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, March 31, 2014, 14:01