अमिर खानला पोहोचला धोका, mr. perfectionist aamir khan pulls a muscle due to heavy work out

वजन कमी करण्याच्या नादात अमिर खानला पोहोचला धोका

वजन कमी करण्याच्या नादात अमिर खानला पोहोचला धोका
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

राजकुमार हिरानी याच्या आगामी सिनेमा `पीके`साठी आपले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अभिनेता अमिर खान याला धोका पोहोचला आहे. वजन कमी करण्याच्या नादात जास्त वर्कआऊट केले आणि त्याच्या मांसपेशी आकुंचन पावल्यात.

याबाबत अमिरने वर्कआऊट करणाऱ्यांसाठी इशारा देताना सूचना केलेय. तुम्हाला झेपेल एवढे वर्कआऊट करा. जास्त मस्ती करु नका, ते तुमच्या अंगलट येईल. मी जास्त वजन कमी करण्यासाठी मोठे वर्कआऊट केले. त्याचा उलटा परिणाम झाला. माझ्या मांसपेक्षी आकुंचन पावल्यात. त्यामुळे मला याचा त्रास होत आहे.

अमिर खान आपल्या शरीरयष्टीसाठी सतर्क आहे. तो व्यायामावर भर देतो. त्यामुळे त्याचा लूक दिवसागणिक तरुणांना भावणारा आहे. तो आपल्या शुटींगमध्ये कितीही व्यस्त असला तरी तो व्यायामाला महत्व देतो. तुम्हीही व्यायामावर भर द्या, असा तो सल्ला देतो. मात्र, प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम करु नका, असे अमिर सांगतो.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, June 14, 2014, 15:41


comments powered by Disqus