Last Updated: Thursday, October 18, 2012, 20:32
www.24taas.com, सहारणपूरकरीना कपूरने इस्लाम धर्म स्वीकारला नसल्यामुळे अभिनेता सैफ आणि अभिनेत्री करीना यांचा विवाह इस्लाम विरोधी असल्याचे आज दारूल उलम देवबंदने जाहीर केले आहे. करीनाने यापूर्वीच इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिला होता.
उत्तरप्रदेशच्या सहारणपूर जिल्हात असलेल्या देवबंद या इस्लामिक संस्थेने हे आज जाहीर केले. सैफशी लग्न करण्यापूर्वी करीनाने इस्लाम धर्म स्वीकारला नाही. त्यामुळे इस्लामला अशा प्रकारचा विवाह मान्य नाही, असल्याचे देवबंदने म्हटले आहे.
मुस्लिम कायद्यानुसार करीनाने इस्लाम धर्म स्वीकारायला हवा होता. त्यामुळे हा विवाह इस्लाम विरोधी असल्याचे देवबंदचे वरिष्ठ मौलवी हबीबूर रेहमान यांनी सांगितले आहे.
सैफ अली खान आणि करीना कपूर यांचे १६ ऑक्टोबर रोजी मुंबईत रजिस्टर पद्धतीने लग्न झाले. या दोघांचा निकाह झाल्याच्या अफवाही पसरल्या होत्या. परंतु दोघांनी काही वचन घेतल्याचे कपूर खानदानाचा जवळचा मित्र आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा याने सांगितले.
First Published: Thursday, October 18, 2012, 20:10