Last Updated: Saturday, July 6, 2013, 18:17
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईनुकत्याच रिलीज झालेल्या लुटेरा सिनेमाच्या चांगल्या ओपनिंगमुळे सोनाक्षी सिन्हाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. माझे सिनेमे हिट होण्यासाठी मला अंगप्रदर्शनाची गरज पडत नाही, असं सोनाक्षीने टेचात म्हटलं आहे.
सोनाक्षीला नुकत्याचं एका मुलाखतीत विचारण्यात आलं होतं, की तुला सिनेमात ग्लॅमरस दिसण्यासाठी कधी सेक्सी कपडे घालावेसे वाटत नाही का? यावर सोनाक्षीने उत्तर दिलं, “मला कधीही उत्तान कपडे घालावेसे वाटत नाही. शाळा आणि कॉलेजमध्येही मी कधीही तोकडे कपडे घातले नाहीत. दिग्दर्शकही कधी माझ्याकडे अशा मागण्या करत नाहीत. माझ्या व्यक्तिमत्वाला ते शोभणार नाही आणि मला तशी आवडही नाही.
“माझे सिनेमे मी अंगप्रदर्शन न करताही चांगले चालतात. मला वाटतं, सामान्य प्रेक्षक माझ्या भारतीय वस्त्रांमुळे माझ्याकडे आपुलकीने पाहातात. आदर करतात. प्रेक्षकांना जवळचे वाटतील, असेच कपडे मी घालमं पसंत करते.” असंही सोनाक्षीने म्हटलं.
२६ वर्षीय सोनाक्षी सिन्हा स्वतः फॅशन डिझायनर आहे. अभिनेत्री बनण्याआधी तिने फॅशन डिझायनिंगचं ट्रेनिंग घेतलं होतं. तसंच काही दिवस तिने फॅशन डिझायनर म्हणून कामही केलं होतं. त्यामुळे सोनाक्षीने अंगप्रदर्शनाला देला नकार हे एक वेगळं फॅशन स्टेटमेंट ठरू शकतं.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Saturday, July 6, 2013, 18:17