मी मुंबईत राहत नाही - नाना पाटेकर, Nana Patekar, Mumbai

मी मुंबईत राहत नाही - नाना पाटेकर

मी मुंबईत राहत नाही - नाना पाटेकर
www.24taas.com, झी मीडिया,बदलापूर

मी मुंबईत राहत नाही आणि मुंबई हे माझे राहण्याचे ठिकाण नाही, अशी खंत अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केलीय.

मुंबई कोणाचीही असो पण ती माझी नाही असं सांगत त्यांनी मनसे आणि शिवसेनेलाही टोला लगावलाय. नाना बदलापूरमध्ये शाश्वत फौन्डेशनच्यावतीने उभारण्यात आलेल्या सहवास वृद्धा श्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होता.

मला खेड्यात राहायला आवडते. मी मुबईत राहत नाही मुबई हे राहण्याचे ठिकाण नाही असे माझे स्पष्ट मत नानाने व्यक्त केलं. खूप वेळा भांडणे होतात मुबई कोणाची ती कोणाचीही असो माझी नक्कीच नाही, असे नाना म्हणाला.


मी नाटक सिनेमात असल्याने आमच्यात थोडेशे वलय आहे मात्र त्याला फारसा अर्थ नाही. परंतु तुमच्या पेक्षा मी लहान आहे कारण तुम्ही तिकीट काढून सिनेमा पाहायला येता. कलाकाराने आपले सामान्य पण जपले पाहिजे कारण बरेचशे जण आपण असामान्य असलायचा आव आणता, मात्र मला त्यांची 'किळस' येत असे नाना म्हणाला.

पुस्तक वाचून अभिनय येत नाही. त्यासाठी माणसे वाचावी लागतात माणसांना भेटावे लागते असंही नाना पाटेकर यांनी सांगितलं.

First Published: Monday, April 29, 2013, 14:04


comments powered by Disqus