अभिनेते नाना पाटेकर अखेर मनसेत!Nana Patekar will Join MNS (April Fool News)

अभिनेते नाना पाटेकर अखेर मनसेत!

अभिनेते नाना पाटेकर अखेर मनसेत!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अभिनेते नाना पाटेकर अखेर मनसेत प्रवेश करत आहेत. आतापर्यंत राजकारणापासून दूर पळणारा नाना सिस्टिम बदलण्यासाठी अखेर राजकारणात पाऊल टाकतोय. येत्या १ मेला नाना मनसेत प्रवेश करणार आहे.

अभिनेते नाना पाटेकर आपल्या अभिनयाबरोबरच वक्तृत्वसाठीही प्रसिद्ध आहे. नाना पाटेकर जेव्हा बोलतात ते सडतोड आणि स्पष्ट असतं. आपली परखड मतं ते कोणालाही न घाबरता मांडत असतात. अशातच नाना पाटेकर यांनी राजकारणात यावं असं अनेकांना वाटतं. मात्र आपण राजकारणात येणार नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

दरम्यानच्याकाळात नाना पाटेकर भाजपमध्ये जाणार अशीही चर्चा होती. यासर्व शक्यतांनी दूर सारत नाना राज ठाकरेंच्या मनसेत जाणार आहेत.

(वाचकांनो या बातमीला अजिबात गंभीरतेनं घेऊ नका... एप्रिल फूलचा महिना एंजॉय करा... हॅपी एप्रिल फूल...)

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 1, 2014, 13:16


comments powered by Disqus