Last Updated: Sunday, March 23, 2014, 10:26
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई संजय लीला भन्साळी यांच्या `राम लीला - गोलियों की रासलीला` या सिनेमानंतर रणवीर सिंग त्यांच्यासोबत पुन्हा एकदा काम करण्यासाठी उत्सुक आहे. तर गुंडे या सिनेमात त्याच्यासोबत दिसलेली प्रियांकाही पुन्हा एकदा रणवीर सोबत दिसण्याची शक्यता निर्माण झालीय.
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी `बाजीराव-मस्तानी` या आणखी एका ऐतिहासिक सिनेमात त्यांनी बाजीरावच्या भूमिकेसाठी त्यांनी रणवीर सिंगची निवड केलीय. आता, या चित्रपटात मस्तानीच्या भूमिकेसाठी प्रियांका चोप्रा हिची निवड झाल्याचं समजतंय.
प्रियांका सध्या भारतीय बॉक्सिंगपटू मेरी कोम हिच्या जीवनकथेवर आधारित चित्रपटासाठी संजय लीला भन्साळींबरोबर काम करत आहे. या चित्रपटासाठी शाहरूख खान, सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्याशीही चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय. पण, योग काही जुळून आला नाही.
आता, प्रियांका आणि रणवीर या जोडीचा एकत्र काम करण्याचा योग जुळून येतोय का? आणि बॉलिवूडला त्यांच्या रुपात बाजीराव मस्तानी मिळणार का? अशी चर्चा रंगताना दिसतेय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, March 22, 2014, 14:47