Last Updated: Thursday, August 16, 2012, 11:51
www.24taas.com, मुंबईपुन्हा प्रेमाची स्वप्नं पाहायला तयार व्हा! प्रेमाचे सौदागर पुन्हा आले आहेत.गेली ५ दशकं रोमँटिक सिनेमांनी भारतीयांना प्रेमाने भारून टाकणारे यश चोप्रा पुन्हा नवा प्रेमपट घेऊन आले आहेत. वयाच्या ८०व्या वर्षी ते हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत. या सिनेमात शाहरुख खान, कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा आहेत. सिनेमाचं नाव जरी अजून ठरलेलं नाही.
‘एक था टायगर’ सिनेमाबरोबर या सिनेमाचं पहिलं ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलंय. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये यश चोप्रांनी आत्तापर्यंत बनवलेल्या सुप्रसिद्ध प्रेमकथांची झलक दाखवली जाते आणि आगामी सिनेमातील काही सीन्स दाखवले जातात.
सिनेमाचं नाव जरी ठरवलं नसलं, तरी या सिनेमात शाहरुख- कतरिना आणि अनुष्का शर्मा लक्षवेधी ठरत आहेत. वीर-झारा नंतर तब्बल ६ वर्षांनी यश चोप्रा सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. सिनेमाला ए.आर. रहमानचं संगीत आहे आणि या सिनेमाची गीतं गुलजार यांनी लिहिली आहेत. या सगळ्यांमुळे सिनेमाबद्दलची उत्कंठा वाढत आहे. हा सिनेमा दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.
First Published: Thursday, August 16, 2012, 11:51