Last Updated: Tuesday, November 12, 2013, 17:16
www.24taas.com, झी मीडिया शर्लिन चोप्राच्या आगामी कामसूत्र थ्रीडी या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन रूपेश पॉलने केलं आहे. हा सिनेमा आणखी चर्चेत यावा, यासाठी स्वतः शर्लिन ट्विटरवर आपले या सिनेमातील काही फोटो अपलोड करत आहे.
यापूर्वीही शर्लिनने आपले फोटोग्राफ्स ट्विटरवर अपलोड केले आहेत. यावेळी ही तिने कामसूत्र थ्रीडीचं पोस्टर अपलोड केलं आहे. या पोस्टरमध्ये शर्लिन पांढऱ्या शुभ्र पारदर्शी साडीत आहे. यात शर्लीनला एका झाडाच्या फांदीवर झोका घेताना दिसत आहे. या पोस्टरमध्ये शर्लिन कमालीची हॉट दिसत आहे. शर्लिनला या पोस्टरमधून सेक्सी दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आलाय. तिचं हे पोस्टर पाहून तिचे आंबटशौकीन चाहते नक्कीच थिएटरमध्ये गर्दी करतील.
तिचं हे पोस्टर पाहून तिने ‘राम तेरी गंगा मैली’ सिनेमातील मंदाकिनीला कॉपी करायचा प्रयत्न केला की काय? असंच वाटत आहे. बहुतेक ‘राम तेरी गंगा मैली’मधील मंदाकिनीच्या वेषात वावरून आपली फॅनलिस्ट वाढवण्यच्या प्रयत्नात आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, November 12, 2013, 17:07