Last Updated: Thursday, September 5, 2013, 21:08
www.24taas.com झी मीडिया, मुंबईबॉलिवूडमध्ये सध्या ‘जंजीर’ सिनेमाची आणि त्यातील गाण्यांची खूपच चर्चा सुरु आहे. प्रियांका चोप्राच्या ‘पिंकी’ आयटम साँगनंतर संजूबाबाचाही एक वेगळा लूक या सिनेमात पाहायला मिळणार आहे. सिनेमात शेरखान बनलेल्या संजय दत्तने कव्वालीवर नाच केला आहे.
१९७२ मध्ये रिलिझ झालेल्या ‘रेशमा और शेरा’ या चित्रपटात संजय दत्तने कव्वाली सादर केली होती. तो चित्रपट सुनिल दत्त यांचा होता. ४१ वर्षानंतर पुन्हा ‘जंजीर’ या चित्रपटात संजय दत्त कव्वाली सादर करणार आहे.
‘जंजीर’ या चित्रपटात संजय दत्त शेरखानच्या भूमिकेत आहे. ‘खोचे पठान की जुबान’ या गाण्यावर कव्वाली करणार आहे. दिग्दर्शक अपूर्व लाखिया यांच्या मते, संजयचा हा रोल आठवणीत राहाण्यासारखा असेल. जंजीर हा चित्रपट शुक्रवारी ६ सप्टेंबरला रिलीज होणार आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, September 5, 2013, 21:08