९ अंक खास, अक्षय कुमारचा ‘बॉस’, nine no special to aakshay kumar

९ अंक खास, अक्षय कुमारचा ‘बॉस’

९ अंक खास, अक्षय कुमारचा ‘बॉस’
www.24taas.com झी मीडिया, मुंबई

अभिनेता अक्षय कुमारचा आगामी सिनेमा ‘बॉस’ चं ट्रेलर आज रिलीज करण्यात आलं आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यासाठी त्याने आपल्या लकी अंकाचा म्हणजेच ‘नऊ’ या अंकाचा आधार घेतला आहे.

अक्षय कुमारसाठी आतापर्यत ‘९’ हा अंक फार लकी ठरला आहे. आजच्या तारखेचा योग नऊ असल्याने त्याने या शुभ दिवशी ‘बॉस’ या आगामी सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अँथनी डिसूजा यांनी केले आहे. या सिनेमाची शुटींग जूनी दिल्ली तसंच थायलंड येथे झाली आहे.

अक्षयची एक्शन आणि हास्यपूर्ण असणारा हा सिनेमा पाहण्यासाठी त्याचे फॅन्स आधिक उत्सुक आहेत. या सिनेमात अक्षय हरियाणवी बोलतांना दिसणार आहे तसंच या सिनेमात तो असे काही स्टंट करणार आहे की जे त्याने अजूनपर्यंत कधीही केले नाहीत. ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा’ हा सिनेमा फारसा हीट न झाल्याने त्याला या सिनेमाकडून अक्षयला सध्या आशा आहेत.

या सिनेमात अक्षयसोबत मुख्य भूमिकेत अदिती राव हैदरी, शिव पंडीत आणि मिथून चक्रवती आहेत. ‘बॉस’ हा सिनेमा येत्या १६ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, August 27, 2013, 19:33


comments powered by Disqus