'काकां'चा शेवटचा चित्रपट वितरकाच्या प्रतीक्षेत, no distributor ready for rajesh khannas last film riyasat

'काकां'चा शेवटचा चित्रपट वितरकाच्या प्रतीक्षेत

'काकां'चा शेवटचा चित्रपट वितरकाच्या प्रतीक्षेत
www.24taas.com, मुंबई

बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांचा शेवटचा चित्रपट आता प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे. पण, महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सिनेमा दिग्दर्शकांना वितरकच मिळत नाहीत.

‘रियासत’ या चित्रपटात राजेश खन्ना यांनी शेवटचा अभिनय केलाय. राजेश खन्ना यांचा मृत्यू झाला त्यावेळी या सिनेमाचे प्रदर्शनापूर्वीचे काही सोपस्कार बाकी होते. सिनेमाचे दिग्दर्शक अशोक त्यागी हे गेल्या शुक्रवारी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तयारीत होते. पण, ही योजना मात्र त्यांना वितरकांच्या कमतरतेमुळे बारगळावी लागली.

त्यामुळे आता हा सिनेमा पुढच्याच वर्षी रिलीज होणार आहे. ‘हा काकांचा शेवटचा चित्रपट आहे. वितरकांना आपल्या व्यवसायाची चिंता आहे. काका महानायक होते... त्यांनी उत्कृष्ट अभिनयाची झलक दाखविली होती. पण, त्यांच्या शेवटच्या चित्रपटाशी मात्र कुणाचं घेणंदेणं नाही. पण, मी मात्र अजूनही विश्वास आहे. काही ना काहीतरी मार्ग जरुर निघेल. काही वितरकांनी पुढच्या वर्षी हा सिनेमा प्रदर्शित करण्याची तयारी दाखवलीय’, असं त्यागी यांनी म्हटलंय.

खन्ना कुटुंबाच्या मदतीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यागी म्हणतात, की ‘खन्ना परिवारानं यासाठी स्वत: पुढाकार घेतला तर मला कोणतीच आपत्ती नाही. पण, मी स्वत:हून त्यांना याबाबत काही म्हणणार नाही’.

रियासत या चित्रपटात राजेश खन्ना यांच्याशिवाय गौरी कुलकर्णी, आर्यन वैद्य, आर्यमान रामसे आणि रजा मुराद यांच्याही भूमिका आहेत.

First Published: Friday, December 28, 2012, 15:24


comments powered by Disqus