सलमानचे छत्तीस नखरे..., No SRK or Aishwarya for Salman on ‘Jhalak’

सलमानचे छत्तीस नखरे...

सलमानचे छत्तीस नखरे...
www.24taas.com, मुंबई
‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमात अनेक जणांनी स्मॉल स्क्रिनवर सलमान खान आणि कतरिना कैफ यांना धम्माल करताना पाहिलं... या कार्यक्रमात सलमाननं आपली फिल्म ‘एक था टायगर’चं प्रमोशनही केलं. पण, कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी त्यानं काय काय अटी घातल्या होत्या तर तुम्हीही तोंडात बोटं घालाल जसं कार्यक्रमाच्या निर्मात्यांना या शूटच्या वेळी घालावी लागली होती.

सूत्रांच्या माहितीनुसार, जेव्हा प्रेक्षक त्यांच्या फेव्हरेट जोडी सलमान-कतरिनाचा परफार्मन्स एन्जॉय करत होते त्यावेळी मात्र या कार्यक्रमाचे निर्माते सल्लूमियाँचा ‘मूड’ सांभाळण्याची कसरत करत होते. इतकंच नव्हे, तर या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी सलमाननं त्याच्या काही अटींची यादीच निर्मात्यांसमोर ठेवली होती.

‘झलक’ची यावेळची थीम होती ‘बॉलिवूडच्या जोड्या’... हे ऐकताच सलमाननं निर्मात्यांसमोर अट टाकली की यावेळी स्टेजवर कुणीही स्पर्धक सलमान आणि त्याची ‘एक्स गर्लंफ्रेंड’ ऐश्वर्या राय यांच्यावर चित्रीत झालेल्या गाण्यावर परफॉर्मन्स करणार नाही. इतकंच नाही तर सलमानला यावेळी आणखी एक व्यक्ती डोळ्यासमोर नको होती. ती म्हणजे ‘नन अदर दॅन’ बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान... मग, दर्शिल आणि अवनीत या स्पर्धकांनी शाहरुखच्या गाण्यावर परफॉर्मन्स कसा केला असा तुमचा प्रश्न असेल... तर, या कार्यक्रमात हा परफॉर्मन्स झाल्यानंतरच सलमाननं कार्यक्रमात एन्ट्री केली होती, हे तुमच्या माहितीसाठी.

कार्यक्रमा दरम्यान, जेव्हा ‘कॅट’नं सलमानला माधुरी दीक्षितसोबत ‘हम आपके है कौन’च्या गाण्यावर थिरकण्यासाठी लाडीगोडी लावली तेव्हाही त्याला हे आवडलं नव्हतं. सलमान तेव्हा डान्सच्या मूडमध्ये नव्हता... म्हणून त्यानं चित्रीकरणानंतर कॅटला चांगलंच फैलावरदेखील घेतलं. चित्रिकरणादरम्यानही सलमान एक वही हातात घेऊन बसला होता यावर तो काहीतरी चित्रं काढत होता. पण, चित्रिकरण संपलं आणि सलमाननं ही वही बघण्याच्या आधीच धूम ठोकली.

हे ऐकून आता तुम्हीही म्हणाल, ‘कतरिना, कशी सांभाळतेस ग बाई ह्याचे मूडस्?’

First Published: Wednesday, August 22, 2012, 12:54


comments powered by Disqus