यापुढे संजय दत्त सोबत काम करणार नाही- नाना पाटेकर, Now i am not work with Sanjay Dutt say`s sanjay dutt

यापुढे संजय दत्त सोबत काम करणार नाही- नाना

यापुढे संजय दत्त सोबत काम करणार नाही- नाना
www.24taas.com, नवी दिल्ली

संजय दत्त याच्यावर अभिनेता नाना पाटेकरांनी टीका केली आहे. संजयसोबत यापुढे चित्रपटात काम करणार नाही, हीच माझ्या परीनं दिलेली शिक्षा असेल, असं नाना म्हणाला. पण लोकही मात्र विचित्र वागतात. त्याचे सिनेमे पाहतात.

संजयला डोक्यावर घेतात. अभिनेता म्हणून सारं काही माफ.. असं वागतात. आणि त्यानंतर मात्र त्याला शिक्षा झालीच पाहिजे अशीही मागणी करतात. लोकांनी अशी दुटप्पी भूमिका घेऊ नये, एकीकडे लोक संजयचे सिनेमे बघतात आणि दुसरीकडे त्यानं मुदतवाढ याचिका केल्यावर टीका करतात, असं नाना म्हणाला.

नाना पाटेकर याने अतिशय तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. `झी मीडिया`च्या प्रतिनिधीशी बोलताना नाना पाटेकर यांने स्पष्ट केले की, यापुढे मी संजय दत्तसोबत काम करणार नाही. आणि हीच त्याला माझ्याकडून शिक्षा असेन. असं म्हणत नाना पाटेकर यांनी एका आगळ्या-वेगळ्या प्रकारे संजय दत्तवर बहिष्कार टाकला आहे.

First Published: Saturday, April 20, 2013, 19:17


comments powered by Disqus