अधिकाऱ्यांनी माधुरीला दिलं हाकलून..., officer insult madhuri dixit at bhopal airport

अधिकाऱ्यांनी माधुरीला दिलं हाकलून...

अधिकाऱ्यांनी माधुरीला दिलं हाकलून...

www.24taas.com, झी मीडिया, भोपाळ

नुकतंच, माधुरीला एका धक्कादायक घटनेला सामोरं जावं लागलंय. आपल्या सिनेमाच्या प्रमोशनकरता ती भोपाळमध्ये आली असताना तिला अधिकाऱ्यांनी चक्क एअरपोर्ट व्हीआयपी लाऊंजमधून बाहेर काढलं...

त्याचं झालं असं, की आपल्या आगामी ‘गुलाब गँग’ या चित्रपटाच्या प्रमोशनकरता माधुरी भोपाळमध्ये दाखल झाली होती. यावेळी, तिच्यासोबत चित्रपट निर्माता अनुभव सिन्हा हेदेखील उपस्थित होते. मुंबईला परतताना ती काही वेळ भोपाळ एअरपोर्टवर होती. यावेळी, काही अधिकारी माधुरीला आपल्यासोबत व्हीआयपी लाऊंजमध्ये घेऊन गेले. तसंच आपल्यासोबत फोटो काढण्याची माधुरीला गळ घातली.

यावेळी, सिनेमाच्या प्रमोशननंतर थकलेल्या माधुरीनं त्यांची मागणी धुडकावून लागली. त्यामुळे, नाराज झालेल्या या अधिकाऱ्यांनी माधुरीला चक्क एअरपोर्टच्या व्हीआयपी लाऊंजमधून बाहेर जाण्यास सांगितलं.

रविवारी वडोदरामध्ये उपस्थित झालेल्या माधुरीला याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा माधुरीनं याबद्दल चकार शब्द काढण्यास नकार दिला.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, March 3, 2014, 13:01


comments powered by Disqus