Last Updated: Wednesday, September 25, 2013, 17:09
२०१४ मध्ये भाजपच सत्तेवर येईल, असा दावा भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी येथे केला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसने सत्तेचा गैरवापर केला आहे. स्वत:च्या हितासाठी काँग्रेसने सीबीआयचा वापर केला आहे. देशाची वाट काँग्रेस सरकारमुळे झाली आहे, असे मोदी म्हणालेत.