युक्ता मुखीला मारहाण, ओम पुरींच्या जामीनावर सुनावणी, Om Puri granted anticipatory bail till Aug 30

युक्ता मुखीला मारहाण, ओम पुरींच्या जामीनावर सुनावणी

युक्ता मुखीला मारहाण, ओम पुरींच्या जामीनावर सुनावणी
www.24taas.com झी मीडिया, मुंबई

उच्च न्यायालयाने मिस वर्ल्ड युक्ता मुखी हिचा पती प्रिन्स तुली याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर तात्काळ सुनावणीचे आदेश दिल्याने ओम पुरी यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर होणारी सुनावणी शुक्रवारी न घेता शनिवारपर्यंत तहकूब केली.

पत्नीला मारहाण केल्याप्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पुरी यांनी न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर शुक्रवारी सत्र न्यायाधीश डी. ए. ढोलकीया यांच्यासमोर सुनावणी झाली. सत्र न्यायालयाने ओम पुरी यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी होणारी सुनावणी शनिवारपर्यंत तहकूब केली.

त्यात पुरी यांच्यावतीने युक्तीवाद सुरू होताच न्यायालयाने स्पष्ट केले की, प्रिन्स तुली यांच्या अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे पुरी यांच्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे. पण ही सुनावणी सोमवारी घेण्यात यावी अशी विनंती पुरी यांची पत्नी नंदिता आणि त्याचे वकील सतिश मानेशिंदे यांनी केली.

या विनंतीस विरोध करत अॅड. नितीन प्रधान यांनी ही सुनावणी शनिवारी म्हणजे आजच सकाळी घण्याची मागणी केली होती. त्यांची मागणी न्यालयाने मान्य केली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, August 31, 2013, 14:27


comments powered by Disqus