ओम पुरी यांची `हॉलिवूड जर्नी` गोत्यात?

Last Updated: Tuesday, September 3, 2013, 10:33

अभिनेता ओम पुरी यांना हॉलिवूडमधून मिळालेली ‘द हंड्रेड फूट जर्नी’ आता जरा जास्तच लांबणार असं दिसतंय. कारण, या चित्रपटाच्या शुटींगसाठी जाण्यात कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या ओम पुरी यांना बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागणार आहे.

ओम पुरी- अटक आणि सुटका!

Last Updated: Monday, September 2, 2013, 12:35

पत्नीवरील हल्ल्या प्रकरणी अभिनेता ओम पुरीला शनिवारी रात्री अटक करण्यात आली. मात्र लगेचच जमानतीवर त्यांची सुटकाही झाली. वर्सोवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक हरिश्चंद्र परमाले यांनी दिलेल्या माहितीनुसार “ओम पुरी यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. मात्र त्यानंतर १० हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना जमानत देण्यात आली.”

युक्ता मुखीला मारहाण, ओम पुरींच्या जामीनावर सुनावणी

Last Updated: Saturday, August 31, 2013, 17:45

उच्च न्यायालयाने मिस वर्ल्ड युक्ता मुखी हिचा पती प्रिन्स तुली याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर तात्काळ सुनावणीचे आदेश दिल्याने ओम पुरी यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर होणारी सुनावणी शुक्रवारी न घेता शनिवारपर्यंत तहकूब केली.

ओम पुरी यांनी फेटाळले पत्नीचे मारहाणीचे आरोप

Last Updated: Thursday, August 29, 2013, 09:34

अभिनेते ओम पुरी यांनी पत्नी नंदिता यांनी केलेले मारहाणीचे आरोप साफ फेटाळून लावलेत. ओम पुरी यांच्या म्हणण्यानुसार ‘जर घरात काठीच नसेल तर मी पत्नीला काठीनं मारहाण करूच कसा शकतो? जर काठीनं मारहाण झाली असेल तर त्या काठीची फॉरेन्सिक टेस्ट व्हायला हवी’.

ओम पुरीची पत्नीला मारहाण, फरार घोषित

Last Updated: Wednesday, August 28, 2013, 11:38

बॉलिवूड अभिनेता ओम पुरी यांच्याविरुद्ध अंधेरीमध्ये पत्नीला मारहाण केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आलाय. हा आरोप त्यांची पत्नी नंदीता ओम पुरी यांनीच नोंदविलाय.