शाहरुखवर १०० कोटींचा खटला दाखल, ‘Om Shanti Om’ row: Manoj Kumar`s legal slap to Shah Rukh Khan!

शाहरुखवर १०० कोटींचा खटला दाखल

शाहरुखवर १०० कोटींचा खटला दाखल
www.24taas.com , मुबंई

बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान पुन्हा अडचणीत येण्याचे संकेत दिसून येत आहेत. ‘ओम शांती ओम’ या सिनेमात चेष्टा केल्याप्रकरणी अभिनेता मनोज कुमार यांनी मंगळवारी ‘इरोस इंटरनेशनल’ या फिल्मकंपनी आणि शाहरुख खानविरूद्ध पुन्हा एकदा तक्रार दाखल केलीय.

मनोज कुमार यांनी मंगळवारी अंधेरी स्थित कोर्टात अर्ज दाखल केलाय. या खटल्याची पहिली सुनावणी ६ एप्रिल रोजी होणार आहे. ‘ओम शांती ओम’ हा सिनेमा २००७ साली प्रदर्शित झाला होता. त्यावेळीही मनोज कुमार यांनी शाहरुखला माफ करत आपली चेष्टा करणारी दृश्यं वगळण्याची सूचना केली होती. शाहरुखनं त्यावेळी ती अंमलातही आणली होती. पण, नुकताच हा सिनेमा जपानमध्ये प्रदर्शित झाला. जपानमध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या सिनेमात मात्र ही दृश्यं कायम होती. त्यामुळे मनोज कुमार यांचा पारा थोडा जास्तच चढलाय.


दुसऱ्यांदा अपमान केल्याप्रकरणी मनोज कुमार यांनी आता शाहरुख आणि इरोसवर १०० कोटींचा खटला दाखल केलाय. ‘माझा अपमान करणारी दृश्यं न वगळताच सिनेमा जपानमध्ये प्रदर्शित करण्यात आलाय. मी यापूर्वी त्यांना माफ केलं होतं पण आता मात्र मी त्यांना सोडणार नाही’ असं मनोज कुमार यांनी म्हटलंय.

First Published: Wednesday, April 3, 2013, 18:19


comments powered by Disqus